अमरावती शहरातील गेल्या तीन दिवसा पासुन मुसळधार पाऊस सुरु असल्याने वडाळी तलाव ओव्हर फ्लो झाला. या मुसळधार पावसामुळं तलावाच्या पाण्याची पातळी वाढली आणि पाण्यानं तलावाची पातळी ओलांडताच तलावाच्या भिंतीवरून खाली पाणी कोसळायला लागलं. तलाव ओव्हर फ्लो झाल्याने भिंतीवर पाऊस पाणी वाहू लागल्याचे दृश्य मनमोहक दिसू लागले आहे. वडाळी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने मुले पोहण्याचा आनंद घेत आहे.












