आज सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. सरकारी निवासस्थानी सुरु असलेल्या जनता दरबारादरम्यान हा हल्ला झाला आहे. या संपूर्ण घटनेचे कारण अद्याप अस्पष्ठ असून लवकरच कारण समोर येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर हा तक्रार करण्यासाठी जनता दरबारात आला होता. त्यावेळी त्याने काही कागदपत्रे जनतादरबारात सादर करत अचानक आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करत या व्यक्तीने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दगडाने हाणण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर त्यांच्या कानशिलात लगावत शिवीगाळ केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच धावपळ उडाली.
घडलेल्या संपूर्ण घटनेचा दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी निषेध केला आहे. हा प्रकार घडण्यामागे नेमकं कारण काय आहे यावर चौकशी सुरु असून लवकरच कारण स्पष्ट होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
“घडलेला प्रकार निंदनीय असून महिला सुरक्षा आणि दिल्लीतील सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे” असे वक्तव्य दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी व्यक्त केले आहे. तसेच या संपूर्ण घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिल्लीच्या राजकारणात आता नवीन वाद निर्माण झाला असून या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करत पुढील तपस सुरु केला आहे.












