दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी निर्माण झाली आहे.सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती कायम आहे.जिल्ह्यातील नदी,नाले तुडुंब भरून वाहत असून तब्बल ११ मार्ग अजूनही बंद आहेत.












