मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राज ठाकरेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ सुरू आहे. ‘वर्षा’ वर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची तब्बल 50 मिनिटं चर्चा झाली यांनतर राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. आता या पत्रकार परिषदेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.