जागतिक तंत्रज्ञान दिग्गज ॲपलने बेंगळुरूमधील सॅंकी रोडवरील एम्बसी झेनिथ इमारतीच्या ५व्या ते १३व्या मजल्यांवर सुमारे २.७ लाख चौरस फूट कार्यालयीन जागेसाठी १० वर्षांचा लीज करार केला असून एकूण खर्च तब्बल ₹१,०१० कोटी आहे. हा करार भारतातील ॲपलचा सर्वात मोठ्या ऑफिस प्रोजेक्टपैकी एक मानला जात असून कंपनीच्या संशोधन, अभियांत्रिकी आणि ऑपरेशन्स विस्तारासाठी हा मोठा पाऊल म्हणून पाहिला जात आहे.












