छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील मौजे, सय्यदपूर, मुरूमखेडा येथे मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे दोन गावाला जोडणारा पूल हा अक्षरशः वाहून गेला आहे. गावातील ग्रामस्थांनी प्लास्टिक पाईप ठेवून त्यावर लाकडी फळी ठेवत शालेय विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता रस्ते केला. पर्यायी रस्ता करून पुलाचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.












