राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, कबूतर-हत्ती अशा विषयांत अडकून मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. शहरांमध्ये डबल पार्किंग व ‘नो पार्किंग’ची समस्या गंभीर बनली असून, त्यावर तोडगा म्हणून ‘स्मार्ट पार्किंग’ची व्यवस्था करण्याची गरज आहे. लहान मैदाने पार्किंगसाठी वापरता येतील, मात्र मुलांची खेळाची मैदाने सुरक्षित ठेवली पाहिजेत, असेही त्यांनी सुचवले.