नवी दिल्ली 22 ऑगस्ट 2025
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निर्णय देत दिल्ली आणि एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांच्या ‘घरवापसी’ ला हिरवा कंदील दाखवला. याआधी 11 ऑगस्टच्या आदेशात सर्व कुत्र्यांना आश्रयस्थळात हलवण्याचा आदेश होता, मात्र त्यावर प्राणीप्रेमींनी जोरदार आक्षेप घेतला होता ani आंदोलन ही पेटलं होत.
न्यायालयाने आता स्पष्ट केले आहे की निर्बिजीकरण व लसीकरण झालेल्या कुत्र्यांना त्याच भागात सोडावे, जिथून त्यांना पकडले गेले होते. मात्र, रस्त्यावर कुत्र्यांना खाऊ घालण्यावर कार्यवाही करण्यात येईल. कुत्र्यांना खायला घालण्यासाठी महापालिकेला प्रत्येक प्रभागात अधिकृत खाऊ घालण्याच्या जागा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हिंसक वा रेबिसग्रस्त कुत्र्यांना मात्र सोडू नये, त्यांना कायमस्वरूपी आश्रयस्थळात ठेवावे, असा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय संपूर्ण देशासाठी भटक्या कुत्र्यांबाबत एकसमान धोरण तयार करण्याचा निर्णयही न्यायालयाने घेतला आहे.
कोणत्याही व्यक्ती ची इच्छित असल्यास महापालिकेत अर्ज करून भटक्या कुत्र्यांना दत्तक घेऊ शकतो, मात्र असे कुत्रे पुन्हा रस्त्यावर सोडता येणार नाहीत, दत्तक घेतल्यानंतर पूर्ण जिम्मेदारी मालिकांची असेल. रस्त्यावर खाऊ घालणारे किंवा नगरपालिकेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हा नवा आदेश 11 ऑगस्टच्या कठोर आदेशाला रद्द करून कुत्र्यांच्या ‘रस्त्यावरून थेट आश्रयस्थळ’ या योजना ऐवजी ‘गाव ते गाव, गल्ली ते गल्ली परत’ योजना लागू होणार आहे
लेखक – अमित आडते