आज सकाळी 9:45 वाजेच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका जिगरी मित्राने चाकू हल्ला केला आहे. यात राहुल आहिरे याने त्याचा जिगरी मित्र आकाश शेजुळ याच्यावर चाकूने वार केले व गंभीर जखमी केले आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच राहुल आहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.