वाशिम जिल्ह्यातील अनसिंग मंडळातील गावातील शेतकऱ्यांनी आज अनसिंग येथील स्वयंचलित हवामान केंद्राच्या चुकीच्या पावसाच्या नोंदींविरोधात तीव्र आंदोलन केले. हवामान केंद्रातील पाणी मोजमाप यंत्र लीक असून वायरिंग जळालेली आहे, त्यामुळे खोटी पावसाची नोंद होत आहे. या चुकीच्या नोंदींवर आधारित पंचनामे तयार झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पावसाच्या मोजमापाच्या बोगस अहवालांची होळी करून निषेध नोंदवला आहे.












