गेल्या दहा दिवसांपूर्वी पुणे-नागपूर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू करण्यात आली. 12 तासांत प्रवास पूर्ण होत असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, बुधवार पर्यंत आठ फेऱ्या झाल्या आहेत. यातून 4 हजार 965 प्रवाशांनी प्रवास केला असून, रेल्वेला 67 लाख 98 हजार 44 इतके उत्पन्न मिळाले आहे.












