विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात एक दुर्दैवी घटना घडली होती. दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या पवईच्या गोविंदा पथकातील आनंद सुरेश दांडगे हा युवक खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर विक्रोळीतील सुश्रुषा या खाजगी रुग्णालयात उपचार देखील सुरू होते. मात्र त्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे..