गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा सुरु असताना आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गणेशोत्सवासाठी घरी येण्याचे आमंत्रण दिले आहे. राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना घरी बोलावले आहे..












