गणेशोत्सव काळात अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने समाजमाध्यमांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सायबर सेलची यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे चुकीची माहिती, संदेश किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्यांचा लगेच शोध घेतला जाणार आहे. यामध्ये संदेश प्रसारित करणाऱ्यांचे फॉलोअर्स, ते कोणते यूट्यूब चॅनेल पाहतात, कोणाला संदेश पाठवतात याचाही शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहेत.