येवला शहरातील निलख गल्ली,पिंजार गल्ली, बुंदेलपुरा भागात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याही कर्मचाऱ्याने फोन उचलत नसल्याने महावितरण कार्यालय परिसरातच ठिय्या आंदोलन केले. यापुढे वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला. RNO












