साताऱ्यात “फिटनेस का डोस – आधा घंटा रोज” या फिट इंडिया मिशन अंतर्गत जिल्हा पोलीस दलातर्फे सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. १० किलोमीटरच्या या सायक्लोथॉनमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्यासह २५० ते ३०० सायकलपटूंनी सहभाग नोंदविला. पोलीस कवायत मैदान येथे समारोप झाला. सहभागी सायकलपटूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले असून सरकारच्या या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्य व फिटनेसची जाणीव निर्माण करणे हा आहे.