नांदेडच्या उमरी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. उमरी तालुक्यातील बोरजुनी येथे प्रेम प्रकरणातून वडिलांने मुलगी आणि तिचा प्रियकराची हत्या करून प्रेत विहरीत फेकून दिले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरजुनी येथील संजीवनी कमळे व लखन भंडारे यांचे प्रेम प्रकरण होते. या घटनेची माहिती मुलीच्या वडिलांना लागली त्यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीचे लग्न तालुक्यातील गोळेगाव येथे लावून दिले.