तेलंगणा सरकार गणेश आणि दुर्गा उत्सवासाठी अधिकृत मंडळांना मोफत वीजपुरवठा करणार आहे. गणेश मंडळांना २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर, म्हणजेच ११ दिवसांसाठी ही सुविधा मिळेल, तर दुर्गा मंडळांना 29 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत मोफत वीज दिली जाईल. ही योजना केवळ नोंदणीकृत मंडळांसाठीच असून, त्यांना तेलंगणा साऊदर्न पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.












