ग्रेटर नोएडातील निक्की हत्याकांडानंतर आता राजस्थानच्या जोधपूरमध्येही धक्कादायक घटना घडली आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून शिक्षिका संजू बिश्नोई हिने स्वतःला आणि तिच्या लहान मुलीला पेटवून घेतले. यात मुलगी यशस्वीचा जागीच मृत्यू झाला, तर संजूने उपचारादरम्यान प्राण गमावले. पोलिसांना मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये संजूने पती व सासरच्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.












