मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून सरकारवर चेष्टा केल्याचा आरोप त्यांनी केला. “मराठा समाजाला मूर्ख बनवतात, माझा आणि समाजाचा अपमान करतात. पण आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही. गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही,” असा ठाम निर्धार जरांगेंनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंदोलन आणि सरकारमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.