मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली. आझाद मैदानात आंदोलनासाठी केवळ एका दिवसाची परवानगी देणं म्हणजे गोरगरिबांची चेष्टा असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून पूर्णवेळ आंदोलनाची परवानगी द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. फडणवीस यांनी मोठं मन करून संधीचं सोनं करावं, अन्यथा मराठा समाज नाराज राहील, असा इशाराही त्यांनी दिला.