सांगली जिल्ह्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा, फिर्यादीस गरोदर करून मुल प्राप्त करण्याचा आणि नंतर मारहाणीचा आरोप आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी शंकर माने यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करून माने यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.