ईद – ए – मिलादला मुस्लिम बांधव अत्यंत उत्साहात जुलूस ( मिरवणूक ) काढतात, त्याच प्रमाणे हिंदू बांधव सुद्धा विसर्जन मिरवणूक अत्यंत उत्साहात काढतात. दोन्ही समाजाचे सण एकत्र आल्यामुळे, मिरवणुका एकत्र काढल्या गेल्या तर कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये, हिंदू बांधवांना त्यांचा सण आनंदात साजरा करता यावा तसेच प्रशासनाला देखील सलग बंदोबस्ताचा ताण नको म्हणून मुस्लिम बांधवांनी आपला ईद – ए – मिलाद उन नबी चा जुलूस दि.५ शुक्रवार ऐवजी दि. ८ रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.