नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ढकांबे फाटा येथे आज भीषण अपघात घडला आहे. छोटा हत्ती आणि सिटी लिंक बस यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात छोटा हत्तीचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बस मध्ये एकूण आठ प्रवासी होते. सुदैवाने चालक महेंद्र जगताप आणि वाहक हेमंत वाघ यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.