मुंबईतील उल्हासनगरमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी ॲड. सरिता खानचंदानी यांनी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवेळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍड. खानचंदानी यांच्याकडे एका काम करणाऱ्या तरुणीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले, याचमुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलली असण्याची शक्यता आहे. पोलीस या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्रकरणाची माहिती:
बुधवारी (28 ऑगस्ट) रोजी विठ्ठलवाडीतील रोमा अपार्टमेंट इमारतीवरून ऍड. सरिता खानचंदानी यांनी उडी मारून आत्महत्या केली. त्यांनतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले खरे पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसांनी त्यांच्या तरुण मोलकरणीने त्यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून त्या तरुणीचा शोध सुरु आहे. त्यांच्या निधनामुळे पर्यावरणासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पर्यावरणसाठी काम करणाऱ्या एक कार्यकर्ता आपण गमावला असल्याची सगळ्यांची भावना आहे.
पर्यावरण रक्षणासाठी मोठे योगदान
– ॲड. सरिता खानचंदानी ‘हिराली फाउंडेशन’ एनजीओच्या संस्थापक
– पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली
– शहरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात मोठा कायदेशीर लढा
– वालधुनी नदीच्या प्रदूषणाविरोधातही अनेक याचिका दाखल
– नागरिकांना स्वच्छ पर्यावरण मिळावे यासाठी सतत प्रयत्नशील
– पर्यावरणीय कार्यामुळे एक आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख
– प्रीती हिंगणे (लेखिका)