CSMT परिसरातील खाण्याची सर्व दुकाने बंद असल्यामुळे आंदोलकांचे खाण्याचे खूप हाल होत आहेत. त्याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आंदोलकही पेटले आहेत. त्यामुळे त्यांनी सगळीकडे चक्काजाम केला असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अनेक राजकीय मंडळी जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेत आहेत.