बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चोभानिमगाव येथील कडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कडी नदीने रौद्र रूप धारण केलेले दृश्य पाहायला मिळत आहे.