छत्रपती संभाजीनगरमध्ये सणासुदीच्या काळात नशेच्या औषधांच्या विक्रीवर पोलिसांच्या मोठ्या धडक कारवाईत 1270 नशेच्या औषधी जप्त करण्यात आल्या. अमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने सिडको परिसरात छापा टाकून दोन आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत नांदेडवरून ट्रॅव्हल्सने औषधं येत असल्याचे उघड झाले. बससह 23 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.