गोंदिया शहरात नगर परिषदेच्या जागेवर भाड्याने दिलेल्या दुकानदारांनी नगर परिषदेची परवानगी न घेता दुमजली नवीन बांधकाम सुरु केले आहे. पूर्वी पान लाईन भागातील दुकानाला आग लागल्यावरही स्वतःच्या मर्जीने दुकान तोडून नव्याने बांधले होते. सध्या चार दुकाने तोडून बांधकाम सुरू असून, मुख्याधिकारी म्हणतात की चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल.