बैंगलोरमध्ये IT क्षेत्रात काम करणारी, दोन वर्षांच्या मुलाची आई आणि पाच-सहा महिन्यांची गर्भवती शिल्पा पंचांगमठा हिने पतीच्या वाढत्या हुंड्याच्या छळाला कंटाळून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शिल्पाचा पती प्रवीण हा सुद्धा IT मध्ये काम करायचा, मात्र लग्नानंतर त्याने नोकरी सोडून पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला होता. शिल्पाच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नावेळी तब्बल १५० तोळे सोनं देण्यात आलं होतं, तरीही पती व सासरच्या मंडळींकडून सतत अधिक हुंड्याची मागणी होत होती. पोलिसांनी प्रवीणला अटक करून तपास सुरू केला आहे.