हिंदू धर्मात देवी देवतांना निसर्गाशी
जोडल्याचे पाहायला मिळते,
बघा ना.., आपले भगवान शंकराचे प्रिय आहे बैल,
कृष्णाला प्रिय तुळस, विष्णूला कमळ तर
आपल्या लाडक्या बाप्पांना दुर्वा आणि जास्वंदीचे फुल प्रिय आहे…
पण आपल्या लाडक्या बाप्पांना जास्वंदीचे फुल इतके का प्रिय आहे हे तुम्हाला माहितीये का..?
चला तर मग जाणून घेऊया या अलौकिक फुलाच्या मागील गूढ…
लाल जास्वंद हे पंचमहाभूतं यांच्याशी जोडलेले असते
म्हणूनच ती बाप्पांना वाहिली जातात…
या फुलांना उत्साह, सकारात्मकता यांचे प्रतिक मानले जाते.
तसेच पार्वती मातेला देखील जास्वंदाचे फुल प्रिय होते,
त्यावरून आपल्या बाप्पांना पण हेच फुल अत्यंत प्रिय आहे….
या जास्वंदीच्या फुलात अद्भुत अध्यात्मिक ऊर्जा असते…
ते बुद्धी आणि ज्ञानाचा विकास करते.. त्यामुळेच हे फुल बुद्धीच्या देवतेला
अर्पण केले जाते…
यंदाच्या गणेशोत्सवात फुलांच्या मागील श्रद्धा,
परंपरा आणि उर्जा समजून घेऊन
तुमचे मागणे पूर्ण करण्यासाठी
तुम्ही जास्वंदीचे फुले बाप्पांना अर्पण करू शकतात….
पुढील भागात पहा,
एकदंत आणि महाभारताची अद्भुत कथा