ॐ गणेशाय नमः
आपल्या सर्वांच्या जीवनात
सुख समृद्धी,आनंद, श्रद्धा भरणारे गणपती बाप्पा,
सर्वांना विविध रुपात आशीर्वाद आणि दर्शन देतात
विघ्नहर्ता, लंबोदर, गजानन, वक्रतुंड, आणि एकदंत
अशी विविध रूपे, विविध नावे आपल्याला माहिती आहे,
पण तुम्हाला माहितीये का एकदन्ताय अशी उपमा
बाप्पांना कशामुळे पडली…?
यामागे आहे एक अद्भुत आणि ऐतिहासिक कथा –
गणेश पुराणात गणपती बाप्पांना एकदंत म्हटले जाते,
त्यामागे काही जण परशुरामाची कथा सांगतात,
तर काही जण महाभारत लिहितानाचा एक प्रसंग…
एकदा भगवान शंकरांना भेटण्यासाठी
परशुराम ऋषी कैलास पर्वतावर आले होते,
त्यावेळी भगवान शंकर तपश्चर्येत मग्न असल्याने
गणपती बाप्पांनी त्यांना जाण्यापासून अडवले
तेव्हा संतप्त परशुराम आणि गणपती बाप्पा यांच्यात युद्ध झाले,
या युद्धावेळी परशुरामाने कुऱ्हाडीने प्रहार केला,
या प्रहाराने गणपती बाप्पांचा एक दात तुटला,
त्यामुळे त्यांना प्रचंड वेदना झाल्यात. ते त्रासाने विव्हळू लागले,
पुत्राचे दुख माता पार्वतीला पहावेनासे झाले,
माता पार्वती परशुरामाला शाप देणार तेवढ्यात
परशुरामांनी त्यांची चूक मान्य करत माफी मागितली,
अन गणपती बाप्पांना आपल्या तपश्चर्येचे सामर्थ्य,
ज्ञान आणि शक्ती अर्पण केली,
तेव्हापासून गणेशाला एकदंत अशी उपाधी देण्यात आली.
महाभारत लिखानावेळी देखील एकदंताची कथा सांगितली जाते,
महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी गणेशाला बसवले होते,
त्यावेळी लेखन करत असताना घाईगडबडीत गणेशाची लेखणी तुटली,
अखंड लेखन थांबू नये म्हणून
गणपतीने स्वताचा दात तोडून त्याच दाताने
लेखन करण्यास सुरु केले तेव्हापासून ही कथा देखील प्रचलित आहे…
या कथांमधून गणपती बाप्पांच्या ज्ञानाचं,
आणि सहनशक्तीचे दर्शन घडवतात…
पुढील भागात पाहूया…
गौरी गणपतीची कथा