मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना, आंदोलनासाठी दाखल झालेल्या मराठा बांधवांची उपासमार होऊ नये म्हणून ठाकरे गटाने अन्नछत्र सुरू केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला. या अन्नछत्रातून दररोज हजारो मराठा बांधवांना जेवण पुरवले जाणार आहे.












