गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी येथील अतुल कृषी केंद्रातून २६६ रुपयांची रासायनिक खताची बॅग तब्बल ४०० रुपयांना विकल्याचा प्रकार उघडकीस आला. गरज म्हणून अनेक शेतकऱ्यांनी वाढीव दराने हे खत विकत घेतले. मात्र, प्रहार संघटनेने तक्रार करताच जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. या कृषी केंद्रावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.












