पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर रविवारी रात्री साडेअकरा वाजता भीषण अपघात झाला. गोटे-मुंडे गावाजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकल ला जोरदार धडक दिली. यात सागर यशवंत साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच कराड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज हॉस्पिटलला पाठवण्यात आला. दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनधारक पसार झाला असून, कराड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.