भद्रावतीत डोलारा तलाव ओव्हरफ्लो होऊन अनेक घरात पाणी शिरले, अन्नधान्य व साहित्याचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाच्या हलगर्जीवर नागरिकांनी संताप व्यक्त केला. मात्र शिवसेनेचे मुकेश जिवतोडे तत्काळ घटनास्थळी पोहोचले व स्वखर्चाने डिझेल पुरवून पाणी उपसा सुरू केला. त्यांच्या मदतीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला तर प्रशासनावर कारवाईची मागणीही करण्यात आली.