पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे काल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा बांधवांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना अरेरावीची भाषा करून चले जाव चले जाव च्या घोषणा देखील मराठा आंदोलकांनी केल्या होत्या. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी संरक्षण देऊन पुढे रवाना केले होते. मात्र या घटनेच्या निषेधार्थ आज ओबीसी बांधवांनी नीरा बंदची हाक दिलेली आहे. या बंदला निरा गावातील व्यापाऱ्यांनी ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांच्या झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.