सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील दरा परिसरात गेल्या चार -सहा महिन्यापासून बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे. या परिसरात या चार-सहा महिन्यात बिबट्याने एका माणसावर हल्ला केला तर एका शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला असून छोटी मोठी कुत्री, पाडशे शेळ्या मेंढ्या फस्त केल्या आहेत. यामुळे शेतकरी महिला वर्ग आपल्या शेताकडे बिबट्याच्या भीतीमुळे धजावत नाही. बिबट्याच्या दहशती सोबतच लाईटच्या लोड शेडिंग मुळे या परिसरात आणखी बिबट्यांची दहशत व दर्शन वाढले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
दरा परिसरात चार ते सहा महिन्यात बिबट्याने एका माणसावर हल्ला केला तर बिबट्या एका शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला. मागील आठवड्यात एका मेंढपाळाच्या शेळ्या मेंढ्या वर हल्ला करून सात ते आठ शेळ्या मेंढ्याचा फडशा बिबट्याने पाडला होता. एवढंच नाही तर या परिसरातील कुत्री, पाडशे, शेळ्या मेंढ्या फस्त केल्या आहेत. अशा बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील कोणीही शेतकरी महिला वर्ग आपल्या शेताकडे भीतीमुळे धजावत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आज रात्री या परिसरात एका गाई म्हशीच्या गोठ्याजवळ बिबट्या दबा धरून बसला होता. शेतकरी वैरण टाकायला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाले. आरडाओरडा केल्या नंतर हा बिबट्या तिथून पळून गेला.
याबाबत वन विभागाला वारंवार कळवून सुद्धा वन विभागाने यावर कोणतीच कारवाई केली नाही असा स्थानिक नागरिकांचा आरोप असून जर बिबट्याने आमच्यावर हल्ला करून आमचा जीव गेल्यावर वन विभाग यावर कारवाई करणार का?. असा सवालही येथील शेतकऱ्यांनी केला आहे.. आणि यात भरीत भर म्हणून सद्यस्थितीला वाटेगावातील या भागामध्ये लोड शेडिंगमुळे लाईट बंद करण्यात आली असल्यामुळे तेथील लोकांच्या जीवाला धोका आहे. या गोष्टीची दखल शासनाने घ्यावी व लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा.. अशी मागणी ग्रामस्थातून व नागरिकांतून होत आहे.