रायगड जिल्ह्यातील माथेरान येथील गार्बेट पॉईंट परिसरात ८ सप्टेंबर रोजी ट्रेकिंगसाठी गेलेले भारतीय नौदलाचे क्लास २ अधिकारी बेपत्ता झाले होते. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.
मुंबई येथील कुलाबा येथे FTTT डॉकयार्ड येथे नेमणूक झालेले ३३ वर्षीय क्लास २ अधिकारी चौहान हे ट्रेकिंगसाठी गार्बेट पॉईंट परिसरात गेले होते. परंतु त्यानंतर ८ सप्टेबर रोजी ते बेपत्ता झाले. ३३ वर्षीय 33 वर्षीय मास्टर चीफ चौहान यांचा शोध घेणे अजूनही सुरु असून त्यांचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार चौहान हे रविवारी 8 सप्टेंबर रोजी शेवटचे दिसले होते. त्यांचा मोबाईल ट्रेस केला असता त्यांचे शेवटचे लोकेशन त्याचदिवशी सकाळी 8 वाजून 16 मिनिटांनी धोम धरणाजवळ ट्रेस झाला. परंतु त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद आला होता. चौहान हे ट्रेकिंगसाठी मुंबई ट्रेनने भिवपुरी स्टेशनवर गेले होते. त्यानंतर ते गार्बेट ट्रेकिंग मार्गाकडे निघाले होते.
चौहान यांना शोधण्याचे काम महाराष्ट्र माउंटेनिअर रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर MMRCC , भारतीय नौदल आणि वन विभागाचे संयुक्त पथक यांनी सुरु केली आहे. तसेच जंगली भागात आणि दुर्गम भागात द्रोण चा वापर करून शोधमोहीम सुरु आहे.