14 सप्टेंबरला आशिया कप 2025 मधील भारत- पाकिस्तान सामना रंगला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध 7 गडी राखून एकहाती विजय मिळवला होता. मात्र, आता या सामन्यानंतर वेगळ्याच विषयाची चर्चा जगभर होत आहे ती म्हणजे पाकिस्तान आशिया कपमधून माघार घेणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात PCB ने सामानाधिकारी अँडी पायकॉफ्ट यांच्यावर भारताविरुद्ध सामन्यात दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करू दिले नाही. याचसाठी पीसीबी आशिया कप स्पर्धेतून बाहेर पडणार होती. मात्र, पीसबीच्या अध्यक्षांनी यासंबधित अधिकृत माहिती दिली आहे.
पीसीबीचे अध्यक्ष आणि सध्याचे आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख असलेले मोहसिन नक्की यांनी पाकिस्तान आशिया कपमधून माघार घेणार नसल्याचे सांगितले. पाकिस्तानविरुद्ध भारताने सामना खेळला होता, तेव्हा सामन्यापूर्वी झालेल्या नाणेफेकीवेळी मॅच रेफरीने दोन्ही कर्णधारांचे हस्तांदोलन करून दिले नाही. तेव्हा त्यावर नाराज होऊन पाकिस्तानच्या बोर्डाने मॅच रेफरीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सामनाधिकारी अँडी यांना पुढील सामान्यांपासून दूर ठेवावे अशी ही मागणी पीसीबीकडून करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
भारताने सामना जिंकल्यावर भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करता ड्रेसिंगरूम गाठले. यादरम्यान, पाकिस्तान खेळाडू त्यांची वाट बघत असतानाही कोणीही भारतीय खेळाडू बाहेर आले नाहीत. यामुळे पाकिस्तान अध्यक्षांनी त्यासंबंधित नाराजी व्यक्त केली. यासंबंधित पाकिस्तानच्या अध्यक्षांनी हा निर्णय बीसीसीआयच्या भूमिकेनुसार आणि भारतीय सरकारशी सल्लामसलत करून घेण्यात आला होता, असेही सांगितले. पाकिस्तानने केलेली तक्रार आयसीसीकडून फेटाळली जाऊ शकते. तसेच, पुढील सामना पाकिस्तानचा यूएईविरुद्ध होणार असून जर पाकिस्तान मॅच जिंकली तर पुन्हा 21 सप्टेंबरला भारत-पाक आमनेसामने येऊ शकतात.
पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्की यांनी आयसीसीने याकडे शक्यतो दुर्लक्ष करावे. कारण, यामुळे पाकिस्तानच्या बोर्डवर आर्थिक परिणाम होईल. विशेषतः पीसीबीची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. कारण, चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तान बोर्डाचा आर्थिक निधीवर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे पाकिस्तान आशिया कपमधून माघार घेऊ शकत नाही. पाकिस्तान अध्यक्षांनी ही सर्व माहिती त्यांच्या अधिकृत पेजवरून दिली आहे.
भारताच्या विजयानंतर भारताच्या कर्णधार सूर्यकुमार यादव याने भारताचा विजय पहलगाममधील शहिदांना आणि ऑपरेशन सिंदूरला समर्पित केला असून त्याने पाकिस्तानला खडेबोल सुद्धा सुनावले. आता मात्र, 21 सप्टेंबरचा सामना पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.