संपूर्ण महाराष्ट्रात काही महिन्यापूर्वी ओला उबेर यासारख्या रिक्षा कंपन्यांच्या विरोधात रिक्षा आणि टॅक्सी धारकांनी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या भाड्याच्या विरोधात आंदोलन करत संप पाळला होता. तसेच काही दिवसापूर्वी दिलेल्या आंदोलनाच्या धमकीवरून आता राज्य सरकारने आदेश जारी केला आहे.
राज्य सरकार कडून ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप-बेस्ड टॅक्सी आणि रिक्षा कंपन्यांना मोठा झटका दिला आहे. राज्य सरकारने ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप-बेस्ड टॅक्सी कंपन्यांना तात्काळ काळ्या-पिवळ्या टॅक्सींचे मूळ भाडे स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना मुळ भाड्यात 5 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. यापूर्वी ॲप-आधारित म्हणजेच ओला उबेर या टॅक्सींचे भाडे 15-16 रुपये एवढे होते, हे भाडे आता प्रति किलोमीटर नॉन-एसी साठी 20.66 रुपये तर एसी साठी 22.72 रुपये करण्यात आले आहे.
ओला उबेर सारख्या ऍप बेस्ड कंपन्यांकडून सर्वाधिक मागणीच्या वेळी साधारण 46 ते 48 रुपये तर त्यापेक्षा जास्त प्रति किमी भाडे आकारले जाते. आणि मागणी नसलेल्या काळात 10 रुपयांपेक्षा कमी भाडे आकारले जाते. परंतु आता राज्य सरकारणच्या नियमानुसार प्रवाशांना मागणीच्या काळात 34, तर मागणी नसलेल्या काळात 17 रुपये प्रति किमी भाडे आकारण्यात येणार आहे.
या तारखेपासून होणार नियम लागू
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय 18 सप्टेंबर 2025 पासून लागू करण्यात आला असून, ॲप-बेस्ड टॅक्सींसाठी स्वतंत्र भाडे दर निश्चित होत नाही, तोपर्यंत हे दर लागू असणार आहे. सरकारच्या या आदेशामुळे चालक आणि कंपन्यांमध्ये प्रवास दर 80:20 असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे, यानुसार चालकांना 80% वाटा मिळेल. तसेच सर्वाधिक मागणी असल्यास 25 टक्के सूट देण्यात येणार आहे.
ओला उबेर , आणि खासगी रिक्षा चालकांनी भाडेवाढीची आंदोलन करण्याची धमकी काही दिवसापूर्वी दिली होती. त्यानुषणगने हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांना निश्चित दर मिळावे आणि चालकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.