बीड जिल्ह्यात गेल्या काशीद दिवसापासून विनयभंगाच्या आणि गुन्हेगारीच्या बातम्या वाढत चालल्या आहेत. बीडच्या केज येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न गटशिक्षणाधिकारी यांनी केला. लक्ष्मण बेडसकर असे या गटशिक्षणाधिकारीचे नाव असून तो रात्री साडेआठच्या दरम्यान पिडीत मुलगी आणि तिच्या मावशीसह बहिणीला नाश्ता चारण्याच्या बहाण्याने आपल्या चारचाकी गाडीत निर्जनस्थळी घेऊन गेला. तेथे त्याने एका 16 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
या परिसरात काही लोक दाखल झाल्यानंतर बेडसकर याने तेथून पळ काढला. याप्रकरणी केज पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गटशिक्षणाधिकारी बेडसकर आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. ही घटना काल शुक्रवारी घडली होती. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.