नवी मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात नेहमी नव्या घडामोडी घडत असतात. राजकीय वर्तुळात कधी कोणती नवी बातमी समोर येईल सांगता येत नाही. आता राजकारणातील नवी मुंबईत राजकीय रंगभूमीवर मोठा बदल घडत आहे. नवी मुंबईत स्वराज्य पक्षाला मोठा धक्का मिळाला आहे. कारण पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश कदम शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश व्यक्तिगत नसून आगामी मनपा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. विशेष म्हणजे, या पक्ष प्रवेशाद्वारे गणेश नाईक यांना आक्रमक उत्तर देण्याचा उद्देश असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती
अंकुश कदम यांना नवी मुंबईतील लोकसमुदायाच मोठ्या प्रमाणात पाठबळ आहे. अंकुश कदम यांच्या सोबतच विविध पक्षांतील इतर पदाधिकारीही शिवसेनेत सामील होणार असल्याने शिवसेनेला स्थानिक पातळीवर मोठं राजकीय पाठबळ मिळणार आहे. अंकुश कदमांच्या पक्ष बदलण्यामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, मनपा निवडणुकीपूर्वी हा पक्ष प्रवेश शिवसेनेला मजबूत बनवण्याच्या रणनीतीचा एक भाग आहे.
एकंदरीत, स्वराज्य पक्षाच्या प्रमुख नेत्याचा शिंदे गटातील शिवसेनेत प्रवेश हा नवी मुंबईत राजकीय वातावरण तापवणारा आणि आगामी निवडणुकीवर परिणाम करणारा टप्पा ठरणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच पक्षप्रवेशाबद्दल बोलताना अंकुश कदम यांनी,”सध्या मी स्वराज्य पक्षात आहे, तुम्हाला लवकरच कळवतो “, असं म्हटलं होत. त्यानंतर आता शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती त्यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश पार पडणार आहे.