गेल्या काही दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे, या युद्धांमध्ये विराम व्हावा यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु आता रशियाने अमेरिकेला मोठा धक्का दिला असून रशियाने उचललेल्या पावलांमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाल्याचे चित्र दिसत आहे. यासह नाटो देशांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रशिया आणि अमेरिकेचे संबंध आता पूर्वीपेक्षा अधिक बिघडले
यामुळेच रशिया आणि अमेरिकेचे संबंध आता पूर्वीपेक्षा अधिक बिघडल्याचे दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला रशियाकडून वारंवार नाटो देशांना आव्हान दिले जात आहे. या घटनेमुळे काही दिवसापूर्वी रशियाने पोलंड याठिकाणी आपली लढाऊ विमानं घुसवली होती, यानंतर नाटो देश आणि रशिया आमने-सामने आले होते. त्यानंतर नाटोकडून रशियाला इशारा देण्यात आला होता, परंतु पोलंडनंतर रशियानं आपली विमानं एस्टोनियाच्या हवाई हद्दीत घुसवली. त्यानंतर आता रशियानं उचललेल्या पावलांमुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून, नाटो देशांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
अमेरिकेने रशियाला दिले स्पष्ट उत्तर
रशियाचे लढाऊ आणि बॉम्ब वाहक विमाने आता अमेरिकेच्या हवाई क्षेत्रात घुसले आहे. त्यानुसार रशियन विमानांकडून अलास्कामध्ये असलेल्या एअर डिफेन्स क्षेत्राला निशाणा बनवण्यात आलं, परंतु अमेरिकेतील वायुदलाने कॅनडासोबत एकत्र मिशन राबवून रशियन विमानांना आपल्या हवाई क्षेत्रातून बाहेर काढले, यावर आता अमेरिकेकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. ‘एकही रशियाचं विमान आमच्या हवाई हद्दीत प्रवेश करू शकणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार रशियाचे दोन मोठे बॉम्ब वाहक विमाने टीयू-95 आणि दोन लढाऊ विमाने Su-35 हे अलास्काच्या हवाई क्षेत्रामध्ये घुसले होते. नंतर आम्ही ताबडतोब प्रत्युत्तर देत F-16 लढाऊ विमानांच्या मदतीनं त्यांना हवाई क्षेत्राच्या बाहेर काढले.