आई कुठे काय करते फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना उघड झाली आहे. काही महिन्यापूर्वीच रुपाली भोसले हिने नवीन लक्झरी घेतली होती. परंतु आज हीच कार अपघातग्रस्त आढळली.
मिळालेल्या माहितीनुसार, आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसले हिच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून ती सुखरुप आहे. परंतु तिच्या लग्झरी गाडीचं मात्र मोठं नुकसान झालं आहे. खास करून, ही लक्झरी कार अभिनेत्रीने नुकतीच खरेदी केल्या बाबत तिनं सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिली होती.
या अपघाताची बातमी देखील रुपाली भोसलेने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडीओ शेअर करत अपघाताची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. आणि रुपालीच्या सुखरूपतेवर सुटकेचा श्वास सोडला आहे.