झी मराठी वरील लोकप्रिय मालिका कमळी चा कब्बडी स्पेशल ट्रेलर अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. ही मालिका विश्वातील अभिमानाची बाब असून मराठी संस्कृतीचा सर्वत्र गौरव करण्यात आलाय.
महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून कब्बडी प्रसिद्ध आहे. या खेळाचा जागतिक पातळीवर गौरव करण्यात आला. कारण मराठी संस्कृती दर्शवणाऱ्या कमळी या मालिकेचा ट्रेलर थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकलाय. या कमळी मालिकेत ताकद, चातुर्य, संघभावना दर्शवणारा खेळ म्हणजे कब्बडी हा खेळ प्रभावीरीत्या दर्शविण्यात आला आहे, यासह मराठी संस्कृती सोबत जोडल्या गेलेली नाळ सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतेय.
या ऐतिहासिक क्षणाबद्दल कमळी मालिकेतील कमळी म्हणजेच विजया बाबर याना विचारले असता, कमळी हे पात्र माझ्यासाठी फक्त भूमिका नाही तर, माझ्या आयुष्यातील एक प्रेरणादायी प्रवास आहे. ही कथा थेट न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकेल ह्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. यानिमित्त झी मराठी आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार, ज्यांनी कमळीला एवढं मोठं व्यासपीठ दिलं. आज खरंच वाटतंय जग जिंकण्याची सुरुवात आपल्या मातीपासून होत आहे. अशी ती म्हणाली कमळी मालिकेचा प्रोमो टाईम्स स्क्वेअरसारख्या जागतिक स्तरावर झळकणं हा मराठी अस्मितेचा जगभरात झालेला सन्मान आहे.
या कब्बडी विशेष भागात टीम कमळी आणि टीम अनिका यांच्यात थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सामन्याद्वारे फक्त क्रीडा कौशल्यच नाही तर पात्रांची धैर्य, जिद्द आणि संघभावना यांचेही दर्शन घडताना दिसेल. यापूर्वी देखील कमळी मालिकेच्या प्रोमोने सर्वांचे मन जिंकले होते. मुंबई येथील एका नामांकित शाळेत कमळी मालिकेची टीम प्रोमोशन दरम्यान पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवस्तुती गायली होती. त्यानंतर या घटनेची ग्रिनीज बुकने नोंद घेतली होती.