सोलापूर: सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेऊन महापुराबाबत सविस्तर माहिती सांगितली. २१ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात ६ ते ७ तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे घराचे, शेतीचे नुकसान झाले आहे. यातील घराचे नुकसान झालेल्या कुटुंब प्रमुखांना १० हजार रुपयाची मदत केली जाणार असून दोन दिवसात घराचे पूर्ण पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर शेती, शेती साहित्य व इतर पंचनामे सुरु करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील बाधित तालुके अन् गाव-
सिना नदी काठच्या ६६ तालुक्यातील ८८ गावे बाधित झाले आहेत. येथील जवळपास १३ हजारांपेक्षा जास्त लोकांना निवारा शेड निवासची सोय करण्यात आली आहे. त्यांना दोन वेळचे जेवण, पाणी, आरोग्य व स्वच्छता सुविधा देण्यात येत आहे. पुन्हा सिना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्याने माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर मधील नदी काठच्या लोकांना पुन्हा थोड्या फार प्रमाणात फटका बसणार असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना तालुकास्तरीय महसूल अधिकाऱ्यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
सामाजिक संस्थेच्या वतीने दोन वेळचे जेवण-
१२० निवारा केंद्रात १३ हजार ८६० पेक्षा जास्त लोक राहत असून त्यांना अक्षय पात्र सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत दोन वेळचे जेवण आणि पाणी जागेवर पोहोच होत आहे. तसेच नाम फाउंडेशन च्या वतीने दोन ते तीन दिवसात विविध यंत्रणेचे साहित्य येत असल्याने स्वच्छता, डागडुजी, रस्ते दुरुस्त केले जाणार आहेत. आपत्ती ग्रस्त शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी ओला चाराची आवक सुरु झाली असून जागेवर जाऊन वाटप सुरु झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात १० किलो गहू आणि तांदूळ वाटप सुरु होणार आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बोलताना दिली.
सोलापूर जिल्हयामध्ये एकुण बाधित तालुके-
माढा, करमाळा, मोहोळ, अक्कलकोट उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर, अपर मंद्रुप या तालुक्यांना सिना नदीच्या महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे.सोलापूर जिल्हयामध्ये एकुण ८८ गांवे बाधित झाली आहेत.यामध्ये माढा-२२ (अर्शतः २ पुर्णतः २०), करमाळा-११ मोहोळ-२१ (अर्शतः ३ पुर्णतः २०),अक्कलकोट-१०,अपर मंद्रुप-१५ उत्तर सोलापूर-९.
सोलापुरात अठरा हजार कोंबड्या वाहून गेल्या-
सोलापूर जिल्हयामध्ये मयत पशुधनाची आकडेवारी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली आहे. : मयत मोठे मोठे पशुधन-१०३,लहान पशुधन-५३ आहे.मयत कुक्कटपालन-१८०४१ अशी संख्या आहे.शेतीपिकांचे नुकसान पाहिले असता ३ लाख,६०हजार,४८७ बाधित शेतकरी आहेत. आणि ३ लाख,५० हजार,२१६.५० हेक्टर क्षेत्र आहे.या पुरातून ४५२१ व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे.