जम्मू काश्मीर येथील पूंछ जिल्ह्यात मोठी बातमी समोर आली आहे. सुनारकोटा येथे 16 व्या राष्ट्रीय रायफल्स च्या मुख्यालयात संध्याकाळच्या सुमारास ग्रेनेडचा स्फोट झाला आहे. हा स्फोट संध्याकाळी 7.45 वाजेच्या सुमारास घडला. यामध्ये एक जवान शाहिद झाला असून या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे.
सुनारकोट येथे असलेल्या छावणीमध्ये हा स्फोट झाला असून हा स्फोट घडवला तरी कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. घटनास्थळी जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे पथक पोहोचले असून या स्फोटाच्या तपासाला सुरूवात झाली आहे. या स्फोटात एक जवान शहीद झाला असून सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
या स्फोटाबद्दल बोलताना लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘घटनास्थळी स्फोट झाल्याची माहिती समोर आली असली तरीही ही घटना दहशतवादाशी संबंधित असल्याचे दिसत नसल्याचे वक्तव्य लष्कराच्या प्रवक्त्याने केले आहे. तसेच त्याने संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचेही सांगितले. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दहशतवादी कारवाईला आळा घालण्यासाठी या भागात वाहतूक आणि हालचालींवर कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.