सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली आनंदाचा शिधा योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच शिवभोजन थाळी बंद करण्यात आली होती. आता आनंदाचा शिधा बंद होणार असल्याने नागरिकांकडून सरकारवर ताशेरे ओढण्यात येत आहे.
राज्यातील गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा ही योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून दिवाळी आणि सणासुदीच्या काळात रेशन दुकानावर आनांदाचा शिधा किट वितरित केला जात होता. या किट मध्ये 1 किलो चणा डाळ, साखर आणि एक लिटर खाद्यतेलाचा समावेश होता. एवढेच नाही तर हा शिधा लाभार्थ्यांना 100 रुपयात मिळत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु आता त्यांच्या आनंदावर पाणी फेडले आहे.
यावर्षीपासून सुरु झाली ही योजना
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्या काळात म्हणजे 2022 या वर्षींपासून आनंदाचा शिधा ही योजना सुरु करण्यात आली होती. 2023 यावर्षी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब जयंती, गौरी गणपती, दिवाळी या काळात अन आनंदाचा शिधा नागरिकांना वाटप करण्यात आला होता. तर 2024 मध्ये देखील आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला मात्र यंदा ना गणेशोत्सव ना दिवाळी उत्सव कोणत्याही सणासुदीला हा देण्यात आला नाही. म्हणून च ही योजना बंद झाली असल्याची माहिती उघड झाली आहे.
यंदा पावसाने सर्वत्र थैमान घातले होते. यामुळे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा फटका बसल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोर गरिबांना आनंदाचा शिधा मिळावा अशी अशा होती. परंतु दिवाळी तोंडावर असताना सरकारकडून अजूनही कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणाला मिळायचा आनंदाचा शिधा
दिवाळी दसरा यासारख्या सणासुदीच्या काळात आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जात होता. याचा लाभ पांढरे रेशनकार्ड धारकांना सोडून केशरी आणि पिवळा रेशनधारकांना होतो. ही आनंदाचा शिधा योजना सुरु झाल्यानंतर 1 कोटी 72 लाख लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला होता.परंतु यंदाची दिवाळी गोड नसल्याचे मत लाभार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.