मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. चित्रपट दरम्यान तिच्या 8 तास काम करण्याच्या मागणीमुळे तिला संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘स्पिरिट’ आणि प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ सारख्या मोठ्या चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेर दीपिकाने या विषयावर आपले मौन सोडत एका मुलाखतीत आपले मत व्यक्त केले.
दीपिकाने दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, ‘एका महिला कलाकार म्हणून जर 8 तासांची कामाची वेळ मागणे एखाद्याला दबावासारखे वाटत असेल, तर समजा तसे आहे. पण भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक पुरुष सुपरस्टार अनेक वर्षांपासून फक्त 8 तास काम करत आहेत. विकेंडला सुद्धा सुट्टी घेतात, तरी त्यावर कुणी काहीही बोलत नाही. मग मी का 8 तासांची शिफ्ट मागत असेल तर माझं काय चुकलं?
दीपिकाने सांगितले की, ती नेहमी आपली लढाई शांतपणे आणि सन्मानाने लढते. ‘मी अनेक स्तरांवर काम केले आहे. मला मानधनाच्या बाबतीतही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या अनुभवांना मी तोंड दिले आहे. असेही ती म्हणली.
दीपिकाचे म्हणणे आहे की, ती केवळ चांगल्या कामासाठी आणि वर्क-लाईफ बॅलन्स राखण्यासाठी ८ तासांची शिफ्ट मागत होती. ‘ही मागणी कोणत्याही चुकीच्या हेतूसाठी नाही. जर कोणालाही त्याला मान्यता द्यायची नसेल, तर ठीक आहे, पण या निर्णयामुळे माझी प्रतिष्ठा किंवा कामावर परिणाम होणार नाही,’ असेही दीपिकाने स्पष्ट केले. नुकताच दीपिका पादुकोनने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून तिचे नाव दुआ ठेवले आहे.
दीपिकाच्या सध्याच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर दीपिकाकडे सध्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण व्यतिरिक्त अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. ‘किंग’ व्यतिरिक्त दीपिकाला अल्लू अर्जुन आणि ॲटली कुमार यांच्या बिग बजेट चित्रपटातही काम करायला सुरु करणार आहे.
वर्क-लाईफ बॅलन्सबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल
दीपिकाचे हे वक्तव्य फक्त तिच्या कामाच्या अटींसाठी नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील महिला कलाकारांसाठीही प्रेरणादायी आहे. बऱ्याचदा पुरुष कलाकारांच्या कामाच्या अटींवर चर्चा होत नाही, परंतु महिला कलाकार जर समान अधिकार मागतात, तर त्यावर प्रश्न उपस्थित केले जातात. दीपिकाचे हे स्पष्ट मत आणि धैर्य बॉलीवूडमध्ये वर्क-लाईफ बॅलन्सबाबत जागरूकता निर्माण करण्यास मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
अशा प्रकारे, दीपिका पादुकोणने केवळ स्वतःच्या अधिकारासाठी नव्हे, तर संपूर्ण महिला कलाकारांसाठी कामाच्या योग्य अटींच्या मागणीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.